पालकमंत्री गुलाबराव पाटलांची सोशल मिडीयातून बदनामी : तिघांविरोधात गुन्हा


Defamation of Guardian Minister Gulabrao Patal on social media: Crime against three धरणगाव : जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोशल मिडियात बदनामी करीत सोशल मिडीयात क्लीप व्हायरल केल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या एकासह धरणगावातील दोघांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

तक्रारीअंती गुन्हा दाखल
शिंदे गटाचे शहराध्यक्ष विलास रामा महाजन यांच्या तक्ररीनुसार, मंगळवारी दुपारी 12.43 वाजेच्या सुमारास सुमारास धरणगाव शहरातील धरणगाव प्रेस व धरणगाव शहरातील तालुक्यातील इतर सोशल मिडीया (फेसबुक, इंस्ट्राग्राम, व्हॉटसअ‍ॅप) ग्रुपवर ऑडीओ क्लीप वायरल झाली. त्यात जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या मोबाईलवर रमेश पाटील नामक व्यक्ती याने त्याचा मोबाईल क्र.9822363731 यावरुन फोन करुन जालना जिल्हयात मराठा आरक्षणा संदर्भात झालेल्या घटने संदर्भात चर्चा करत असतांना गुलाबराव पाटील यांना अपशब्द वापरुन शिवीगाळ केली व सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनीधी यांना देखील अपशब्द वापरून सर्व लोकप्रतिनीधी यांच्या चारीत्र्यावर घातक असे शब्द वापरुन लोकशाहीचा अपमान केला. सर्व संविधानाने निवडुन आलेल्या लोकप्रतिनीधाचा जाहीर अपमान करत अब्रुनुकसान केले तसेच अन्य दोघांनी सोशल मिडीयातून ही क्लीप व्हायरल केल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !