मनवेल गावातून शेतकर्याची 60 हजारांची बैल जोडी लांबवली
A pair of bullocks worth 60 thousand of a farmer was sent from Manvel village यावल : यावल तालुक्यातील मनवेल गावातील थोरगव्हाण रस्त्यावरील प्लॉट भागात एका शेतकर्याने आपली बैल जोडी बांधली होती मात्र चोरट्यांनी संधी साधून 60 हजार रुपये बैलजोडी लांबवली. मंगळवारी सकाळी चोरी लक्षात येताच यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
मनवेल, ता.यावल या गावात थोरगव्हाण रस्त्यावर कैलास मुरलीधर ठाकूर यांचा प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये त्यांनी त्यांची 60 हजार रुपये किंमतीची बैल जोडी बांधली होती. रात्री बैलांना चारा पाणी टाकून शेतकरी घरी आले. मात्र मंगळवारी सकाळी बैलजोडी जागेवर नसल्याने चोरी झालचे लक्षात आले. यावल पोलीस ठाण्यात कैलास ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बैल जोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.








