आपल्या माणसांनी केलेला सत्कार पक्ष संघटन वाढीसाठी बळ देणार : रोहिणी खडसे


मुक्ताईनगर : खासदार शरद पवार ब व इतर नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकत प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली असून त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. आज मातृभूमी मुक्ताईनगरात तुम्हा सर्वांनी माझा सत्कार केला. आपल्या माणसांनी केलेला हा सत्कार अनमोल आहे. तो मला भविष्यात पक्ष संघटन वाढीसाठी आणि जनसेवे साठी प्रेरणा आणि बळ देत राहील. पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यासाठी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि सहकार्याची आवश्यकता आहे. तुमच्या सर्वांच्या सोबतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन वाढवून पक्षाचे विचार तळागाळार्यंत पोचविण्याचा माझा प्रयत्न राहिल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी येथे व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर त्यांचे मुक्ताईनगरात आगमन झाल्यानंतर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. तत्पूर्वी ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीने रोहिणी खडसे यांचे स्वागत करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, बोदवड बाजार समिती सभापती सुधीर तराळ, रावेर बाजार समिती सभापती सचिन पाटील, सोपान पाटील, निवृत्ती पाटील, रमेश नागराज पाटील, सुधाकर पाटील, दशरथ कांडेलकर, विलास धायडे, राजेंद्र माळी, भागवत पाटील, रामभाऊ पाटील, दीपक पाटील, अनिल वराडे, अनिल पाटील, संदीप देशमुख, पंकज येवले, असगर भाई, दीपक पाटील, रंजना कांडेलकर, लता सावकारे, अश्विनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, रवींद्र दांडगे, सुनील काटे, बबलू सापधरे, प्रवीण पाटील, मस्तान कुरेशी, हरीष ससाणे, एजाज खान, नंदकिशोर हिरोळे, विकास पाटील, प्रदीप साळुंखे, रउफ खान, मेहमूद भाई, संजय कोळी, बाळा भालशंकर, दीपक साळुंखे, मुन्ना बोंडे, विजय चौधरी, प्रदीप बडगुजर, अमोल महाजन, निवृती महाजन, हशम शहा, अन्नू पेंटर, शिवाजी ढोले, बाळा सोनवणे, साहेबराव पाटील, जितेंद्र पाटील, राहुल पाटील, निलेश भालेराव, अजय तळेले, चेतन राजपूत, अजय अढायके, मयुर साठे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !