महाराष्ट्रासह गुजरातमध्ये दुचाकींची चोरी : मालेगावातील अट्टल दुचाकी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
Two-wheeler theft in Maharashtra and Gujarat : Attal two-wheeler from Malegaon in Jalgaon crime branch’s net जळगाव : राज्यातील बुलढाणासह वाशिम व अकोल व गुजरात राज्यातील काही भागातून दुचाकींची चोरी करणार्या अट्टल चोरट्याला जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. संशयिताकडून तब्ब्ल चोरीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच संशयिताच्या चार साथीदारांना गुन्हे शाखेने अटक करीत त्यांच्याकडून चोरीच्या 16 दुचकींसह अटक केली होती. संतोष उर्फ शेरा गजानन इंगोले (रा.पांगरी कुटे, ता.मालेगाव, जि.वाशिम) असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो टोळीचा म्होरक्या आहे.
चौघांची टोळी यापूर्वीच जाळ्यात
बुलढाणा, वाशि, अकोला जिल्ह्यासह गुजरात राज्यातून दुचाकी चोरी करून त्याची जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात विल्हेवाट लावणारी टोळीचा गुन्हे शाखेने नुकताच पर्दाफाश केला होता. चोरी प्रकरणी सुनील शामराव भील (रा.पिंप्री, ता.एरंडोल), खुशाल उर्फ भैय्या राजू पाटील (27, नागदुली, ता.एरंडोल), गोविंदा अभिमन्यू कोळी (45, नागदुली, ता.एरंडोल) आणि हर्षल विनोद राजपूत (20, मोहाडी, ता.पाचोरा) या चार संशयित आरोपींना 30 ऑगस्ट रोजी चोरीच्या 16 दुचाकींसह अटक केली होती.

आरोपीला जळगावात येताच अटक
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार संतोष उर्फ शेरा गजानन इंगोले हा पसार असल्याने त्याचा कसून शोध सुरू असातना बुधवारी आरोपी संतोष इंगोले हा जळगाव शहरात दुचाकी विक्री करण्यासाठी येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळताच त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, गणेश चौबे, सहाय्यक फौजदार अनिल जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप सावळे, नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, महेश महाजन, प्रीतम पाटील, पोलीस नाईक भगवान पाटील, हेमंत पाटील, कृष्णा देशमुख, ईश्वर पाटील, सचिन महाजन, लोकेश माळी, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सूर्यवंशी, प्रमोद ठाकूर यांनी कारवाई करत संशयित आरोपी संतोष उर्फ शेरा गजानन इंगोले याला जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परीसरातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने बुलढाणा, वासिम, अकोला यासह गुजरात राज्यातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या. संशयिताला अधिक कारवाईसाठी संशयित आरोपीला जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
