मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबध्द : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Government is committed to give reservation to Maratha community : Chief Minister Eknath Shinde ठाणे : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबध्द आहे परंतु हे आरक्षण देत असतांना इतर समाजाच्या आरक्षाणाला कुठेही धक्का लावला जाणार नसल्याचा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दिघे साहेबांच्या हंडीला शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
बाळासाहेबांचे विचार विकणार्यांनी शिकवू नये निष्ठा
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार अतिशय गंभीर आहे. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस होते, त्यावेळी त्यांनी आरक्षण दिले होते. ते आरक्षण उच्च न्यायालयानेदेखील अंतिम केले होते परंतु महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टा ते रद्द झाल्याचे शिंदे म्हणाले.

सनातन धर्माला लागणार नाही धक्का
उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे राज्याचा दौरा करीत असून निष्ठेची भाषा करीत असल्याबाबत त्यांना छेडले असता, त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपली निष्ठा विकली, त्यातही बाळासाहेबांचे विचार विकणार्यांनी निष्ठेचे भाषा आम्हाला शिकवू नये, असा इशाराही त्यांनी दिला. सनातन धर्माला आजही अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे कितीही स्टॅलीन किंवा इतर कोणी आले तरी सनातन धर्माला धक्का लागू शकणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
