ब्राह्मण संघ भुसावळतर्फे शिक्षकांचा सत्कार


भुसावळ : शहरातील ब्राह्मण संघाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त ब्राह्मण संघ भुसावळतर्फे ब्राह्मण समाजातील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
याप्रसंगी के.नारखेडे विद्यालयातील शिक्षक सुनील पाठक, मनोज कुलकर्णी व श्रीश चिपळूणकर तसेच इतर विद्यालयातील काही शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर ब्राह्मण संघाचे अध्यक्ष विजय जोशी, प्रमुख अतिथी पुराणिक, अमोल टेंभूर्णीकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून पुराणिक यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एस.पी.पाठक यांनी मनोगतातून ब्राह्मण समाजातील मुला-मुलींनी फक्त नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायाकडे वळावे, असे मत व्यक्त केले. आभार पंकज जोशी यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !