सोयगावातील मराठा बांधवावरील लाठी हल्ल्याचा सावद्यात निषेध
सावदा : सोयगाव तालुक्यासह सोयगाव शहरातील मराठा आरक्षण आंदोलन करणार्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा शहरात निषेध करण्यात आला.
यांची निवेदन देताना उपस्थिती
न्याय हक्कासाठी लढा संविधानिकपणे दिला असताना पोलीस प्रशासन लाठी हल्ला करते व राज्य सरकार तोंडावर बोट ठेवून, डोळे बंद करून पाहत असल्याच्या प्रकाराचा येथे निषेध करण्यात आला. रावेर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवण्यात आला तसेच सोयगाव तालुक्यातील जनतेच्या न्याय हक्कासाठी पाठीशी उभे असल्याचे निवेदन शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सावदा शिवसेना गटातर्फे देण्यात आले. सावदा सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे यांनी निवेदन स्वीकारले. तालुकाप्रमुख धनंजय वासुदेव चौधरी, शहर संघटक शरद भारंबे, शाम पाटील, नितीन महाजन, मिलिंद पाटील, गौरव दिलीप भैरवा, सुनील राणे, शहर प्रमुख भरत नेहेते, किरण दगडू गुरव आदींची उपस्थिती होती.

