‘आमचे घर, राष्ट्रवादीचे घर’ अभियानाचा शुभारंभ

राष्ट्रवादीचे विचार जनमानसात पोहोचवणार ः प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे


Launch of ‘Amche Ghar, NCP Che Ghar’ campaign मुक्ताईगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या संकल्पनेतून ‘आमचे घर राष्ट्रवादीचे घर’ या अभियानास मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील निंबोल गावापासून शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टिकर घराघरात दर्शनी भागावर चिकटविण्यात येणार आहे. या स्टिकरवर ‘आम्ही सदैव साहेबांसोबत, लढा विचारांचा जनतेच्या हिताचा’ असा उल्लेख करण्यात आला आहे. खासदार शरद पवार, आमदार एकनाथराव खडसे, अ‍ॅड.रवींद्र भैय्यासाहेब पाटील, अ‍ॅड.रोहिणी खडसे यांचे फोटो आहेत.

पक्षाची विचारधारा पोहोचवण्यावर भर
या अभियानातुन अतिशय आकर्षक स्टिकरच्या माध्यमातून गावा-गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवली जाणार आहेत. रावेर तालुक्यातील निंबोल येथे मोहन काशिनाथ पाटील यांच्या घरावर या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचे स्टिकर चिकटवण्यात आले. मार्गदर्शन करताना महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सांगितले की, मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. आगामी काळात राष्ट्रवादीचे विचार जास्तीत जास्त नागरीकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. या अभियानांतर्गत कुटुंबांपर्यंत पोहोचून आमचे घर राष्ट्रवादीचे घर ही संकल्पना नागरीकांच्या मनामनात रुजवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदार संघातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतील. कितीही कठिण प्रसंग आले तरी महाराष्ट्रातील जनता सदैव शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी कायम उभी राहिली आहे. आपल्याला आपल्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मजबुत संघटन निर्माण करायचे असून सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांचे नागरीक, पदाधिकारी यांनी अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन रोहिणी खडसे यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, मोहन पाटील, हिरालाल पाटील, गोकुळ पाटील, सुनील पाटील, निलेश पाटील, प्रदीप साळुंखे, जितेंद्र (भैय्या) पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !