शिक्षकांना बीएलओची कामे देणे हा तर सर्वोच्च न्यायालयाचा अवमान : प्र.ह.दलाल


Giving BLO work to teachers is contempt of Supreme Court : Prof. H. Dalal भुसावळ : जिल्ह्यात अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून काम करण्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांनी आदेश दिलेले आहेत. सध्या शिक्षण खात्याच्या आदेशावरून विविध प्रकारच्या परीक्षा घेण्यात शिक्षक व्यस्त व त्रस्त आहेत, लवकरच घटक चाचणी होईल, शिक्षक अध्यापनाचे करत आहेत त्यातच सर्व्हेक्षण कामही आहेच. अश्यातच तहसीलदारांनी कोणताही विचार न करता शिक्षकांना बीएलओ यांना कामाची सक्ती करणारे आदेशपत्र दिले आहे वास्तविकता शिक्षकांना सादर काम देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने याचिका क्र.5659/2007 च्या निर्णयात परीच्छेद क्र 32मध्ये स्पष्ट निर्देश देताना म्हटले आहे की, शिक्षकांना हे काम देणे अनिवार्य असेल तर ते फक्त सुटी असेल, अध्यापनाचे काम नसेल त्याच वेळी द्यावे, असे निर्देश आहेत.

तर अपमान याचिका दाखल करणार
उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांनीही याचिका क्रं.417/2020 च्या निर्णयात सुद्धा वरील प्रमाणेच म्हटले आहे. या बाबींकडे दुर्लक्ष शाळांना सुटी नसताना व शाळेत अध्यापनाचे काम सुरू असताना ,ऐन परीक्षेचा हंगाम असताना शिक्षकांना बीएलओ यांना कामाची सक्ती करण्यात आली आहे. विशेष जेथे एक शिक्षकी शाळा आहे जेमतेम दोन शिक्षक कार्यरत आहेत त्या शाळेतील शिक्षकांनाही वरील कामाचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत पुर्नविचार न झाल्यास संघटनेला अश्या अधिकार्‍यांविरुद्ध उच्च न्यायालयात अपमान याचिका दाखल करणे भाग पडेल, असा इशारा शिक्षक संघटनेचे ज्येष्ठ नेते व भाजपा शिक्षक आघाडीचे राज्य कार्यकारीणी सदस्य प्र.ह.दलाल यांनी दिला आहे.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !