चाळीसगावचे आमदार दिलदार : चाळीसगाव तालुक्यातील 1200 अनाथ विद्यार्थ्यांना होणार सायकलींचे वाटप
चाळीसगाव तालुक्यातील अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी आमदार मंगेश चव्हाणांची दातृत्वाची ओंजळ : 72 लाख रुपयांच्या दातृत्वाची ओंजळ
Chalisgaon MLA Dildar : Bicycles will be distributed to 1200 orphan students of Chalisgaon Taluka चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्याचे जनसामान्यांचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्याकडे जाणारा कुणीही खाली हात फिरून येत नसल्याचे आजपर्यंत एकही उदाहरण नाही. पंढरीची वारी असो व रायगड वारी असो त्यात आमदार मंगेश चव्हाण यांचे दातृत्व व कर्तृत्व दिसून येते. येत्या सोमवार, 11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणात भव्य दिव्य असा सायकल वाटप कार्यक्रम होत आहे. सायकली वाटप हा कार्यक्रम मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते होणार आहे. यापूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांनी बेलगंगा नगर येथील विद्यार्थ्यांला घरी जाऊन सायकल दिली. त्यांच्या कुटुंबियांची आस्तेवाईकपणे विचारपूस केली होती.
प्रतिकूल परीस्थितीत शिक्षण घेणार्यांना मिळणार सायकल
चाळीसगाव तालुक्यातील कोरोना काळात ज्या मुलांच्या आई-वडिलांचे क्षेत्र हरपले आहे. जे अनाथ झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना गावापासून 3 किमी अंतरावर शाळा आहे ज्यांची घरची परिस्थिती हलाखीची आहे. परीस्थितीने गरीब आहेत अशा तालुक्यातील 1200 विद्यार्थ्यांना आमदार मंगेश चव्हाण यांच्या स्वखर्चाने सायकल देण्यात येणार आहे. एका सायकलची किंमत पहिली तर सहा हजार रुपये असून एकूण 72 लाख रुपयांच्या सायकलींचे वाटप होणार असल्याने तालुक्यात आमदार मंगेश चव्हाण यांची एकच चर्चा होत आहे.

आमदार झाले अनाथांचे ‘नाथ’
शासनाने मुलींसाठी अनेक योजना आणल्या आहेत मात्र मुलांना एकही योजना नसल्याचे पाहून विद्यार्थ्यांना आपल्या स्वखर्चाने सायकल दिली तर काय वाईट अशी संकल्पना त्यांनी शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा त्यांच्या सहचरणी प्रतिभा चव्हाण यांच्याशी चर्चा करत अनाथांचा नाथ होऊन विद्यार्थ्यांची दररोजची होणारी पायपीट थांबवून त्यांच्या आनंदात आपला आनंद मानणारे जोडपे यांचा तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहेत. या सायकली पंजाब येथून खरेदी केल्या असून त्या गेल्या 15 दिवसांपासून चाळीसगाव येथील वैभव मंगल कार्यालयात ठेवण्यात आल्या असून सर्व सायकली या हिरो कंपनीच्या असून एकसारख्या असल्याने कुणावरही दुजाभाव होणार नसल्याचे आमदा मंगेश चव्हाण यांनी ‘बे्रकींग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
नागरीकांच्या कामांसाठी जनसेवा कार्यालय
चाळीसगाव तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे काम असेल तर ते आमदार मंगेश चव्हाण यांचे अंत्योदय जनसेवा संपर्क कार्यालयात येतात तेथे त्यांच्या समस्या मांडतात आणि तेथील आमदार मंगेश चव्हाण यांचे कार्यकर्ते त्या नागरीकांचे शासकीय कामांमध्ये मदत करून नागरिकांचे कामे करून देत असतात.
अनाथांचा नाथ होण्यात आनंद : आमदार मंगश चव्हाण
चाळीसगाव तालुक्यातील अनाथ विद्यार्थ्यांना मदत करण्यातच खरा आनंद असून अनाथ विद्यार्थ्यांचा मोठा भाऊ म्हणून मी ही मदत देत असून भविष्यात तालुक्यातील गौरगरीब जनतेसाठी जे काही करता येईल ती मदत मी अवश्य करणार आहे. मला अनाथांचा नाथ होण्यात खरा आनंद असल्याचे त्यांनी ‘बे्रकींग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
