मुख्यमंत्र्यांचा दौरा अखेर ठरला : पाचोरा शहरातील शासन आपल्या दारी उपक्रमास 12 रोजी लावणार हजेरी

जिल्हा प्रशासनाला अधिकृत दौरा प्राप्त : तयारीला वेग


Chief Minister’s visit is finally decided: Pachora city government will attend its Dari program on 12th जळगाव : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाचोरा येथील दौरा निश्चित झाला आहे. पाचोरा येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्य तारखेत दोन वेळा बदल झाल्यानंतर आता मात्र मंगळवार, 12 रोजीचा दौरा निश्चित झाला आहे तर जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा प्राप्त झाला आहे.

असे आहे मुख्यमंत्र्यांचा दौरा
मंगळवार, 12 सप्टेंबर, 2023 रोजी दुपारी 12 वाजता शासकिय विमानाने मुंबई येथून जळगाव विमानतळावर आगमन व तेथून हेलिकॉप्टरने मौजे हडसन शिवार हेलीपॅड, ता.पाचोरा, जि.जळगावकडे प्रयाण, दुपारी 12.15 वाजता मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथे आगमन व मोटारीने एम.एम.कॉलेज मैदान पाचोरा शहराकडे प्रयाण, दुपारी 12.30 वाजता शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ- एम.एम.कॉलेज मैदान, पाचोरा), दुपारी 2.30 वातता मोटारीने मौजे नांद्रा, ता.पाचोरा शहराकडे प्रयाण, दुपारी 2.50 वाता नर्मदा ग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट या कंपनीचे उद्घाटन व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मौजे निंभोरा (नगरदेवळा रेल्वेस्टेशन जवळ), ता. भडगाव, जि.जळगाव व पाचोरा येथे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नविन मुख्य इमारत बांधकामाचे ई-भूमिपूजन (स्थळ- नांद्रा ता. पाचोरा, जि.जळगाव), दुपारी 3.30 वाजता मोटारीने मौजे हडसन शिवार हेलीपॅडकडे प्रयाण, दुपारी 3.45 वाजता मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथे आगमन व हेलीकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे प्रयाण, दुपारी चार वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !