चाळीसगाव तालुक्यात तब्बल 12 वर्षानंतर उद्या आमसभा
After 12 years in Chalisgaon taluka, general meeting tomorrow चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यात तब्बल 12 वर्षानंतर आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चाळीसगाव तालुक्यातील सर्व शासकीय विभागांची आमसभा आयोजित करण्यात आली आहे.
सोमवार, 18 सप्टेंबर सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान, चाळीसगाव येथे होणार्या आमसभेला शहर व तालुक्यातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी तसेच आपले प्रश्न मांडावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. आमसभेला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याने नागरीकांच्या प्रश्नांचे निरसन करण्यास मदत होणार आहे.


