भरधाव कंटेनर-कारमध्ये अपघात : धुळ्यातील नगरसेवकासह चौघे ठार


Accident in high-speed container-car : Four killed, including a corporator in Dhula धुळे : रुग्णालयातील मित्राला भेटून परतणार्‍या धुळ्यातील नगरसेवकासह चौघा मित्रांचा कार अपघातात मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील वडाळी भोई गावाजवळ सोमवारी पहाटे सात वाजता भरधाव कंटेनर व कारमध्ये धडक झाली. या अपघातात धुळ्याचे भाजपा नगरसेवक किरण अहिरराव यांच्यासह चार मित्र जागीच ठार झाले. नगरसेवक किरण अहिरराव (46), प्रवीण पाटील, अनिल पवार (दोघी रा.अवधान) आणि मोघण ग्रामपंचायतीचे सरपंच आणि मोघण येथील शाळेचे मुख्याध्यापक कृष्णकांत माळी अशी मृतांची नावे आहेत.

परतीच्या प्रवासात गाठले मृत्यूने
धुळे महापालिकेचे नगरसेवक किरण अहिरराव हे आपल्या तीन मित्रांसोबत कार (एम.एच.15 डी.एस.1500) क्रमांकाच्या कारने नाशिक येथील रुग्णालयात मित्राला भेटण्यासाठी गेले असता परतीच्या प्रवासात सोमवारी सकाळी सात वाजता मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक जिल्ह्यातील वडाळी भोई गावाजवळ कंटेनर व कारमध्ये अपघात घडला.

ती सेल्फी ठरली अखेरची
अपघात घडल्याआधी नाशिकमध्ये सोमवारी सकाळपासून महामार्गावर धुके होते. त्यात सेल्फी काढण्याचा मोह झाल्याने नगरसेवक किरण अहिरराव यांनी आपल्या तिघा मित्रांसोबत महामार्गावर गाडी थांबवून सेल्फी काढली. ती सेल्फी त्यांनी व्हॉटसअ‍ॅपवर अनेक ग्रुपमध्ये सेंड केली होती. त्यानंतर काही अवघ्या 15 ते 20 मिनिटांनी हा अपघात घडला.

अपघातामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत
अपघाताची घटना घडताच स्थानिक नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कारमधून या चौघांना बाहेर काढून रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वडनेर भैरव पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे वृत्त धुळ्यात कळताच शोककळा पसरली. मयत झालेले प्रवीण पाटील हे ट्रक व्यावसायिक तर अनिल पवार हे सामाजिक कार्यकर्ते आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !