भुसावळ शहरातील विवाहितेची आत्महत्या


Suicide of a married woman in Bhusawal city भुसावळ : शहरातील रेल दुनिया परीसर, विद्यानगर भागातील 23 वर्षीय विवाहितेने हाताची नस कापून घेतल्यानंतर तिच्यावर रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान विवाहितेची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

रेल्वे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन
श्वेता पवन वावरे (23, रेल दुनिया परीसर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. विवाहितेचे पती पवन श्याम वावरे यांना विवाहितेने हाताची नस कापून घेतली असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला रेल्वे रुग्णालयात हलवले मात्र उपचार सुरू असताना विवाहितेची प्राणज्योत मालवली. तपास सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !