जामठीतील तरुण शेतकर्याचा फवारणीचे औषध शरीरात गेल्याने मृत्यू
A young farmer in Jamthi died after the spray medicine entered his body बोदवड : बोदवड तालुक्यातील जामठी येथील तरुण शेतकर्याचा विषारी औषध शेतात फवारणी करीत असताना मृत्यू झाला. विजय बाळू सुरळकर (जामठी, ता.बोदवड) असे मयत शेतकर्याचे नाव आहे.
विषारी औषध पोटात गेल्याने शेतकर्याचा मृत्यू
सुरळकर या शेतकर्याची जामठी शिवारात शेती असून शेती पिकांसाठी ते औषध फवारणी करीत असताना औषध त्यांच्या शरीरात गेले व अस्वस्थ वाटू लागताच त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार सचिन भास्कर चौधरी करीत आहेत.


