भुसावळात जीम ट्रेनरची चाकूचे वार करीत निर्घृण हत्या


Jim Train brutally stabbed to death in Bhusawal भुसावळ : शहरातील चाकूचे वार असलेल्या 31 वर्षीय तरुणाची दोघांनी चाकूचे वार करीत हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरात यापूर्वी निखील राजपूत या गुन्हेगाराची हत्या करण्यात आल्यानंतर गुन्हेगारी काही प्रमाणात थांबली होती मात्र रविवारी पहाटे खुनाची घटना समोर आल्यानंतर शहरात मोठी खळबळ डाली आहे. नाजीर शेख नशीर (31, खडका रोड, मणियार हॉलजवळ, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर त्यास जळगाव येथे नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट
भुसावळ शहरातील खडका रोड परीसरात नाजीर शेख नशीर (31) हा जीम ट्रेनर तरुण पत्नी, मुलगा, मुलीसह वास्तव्यास होता. माहीर फिटनेस सेंटर चालवून तरुण आपला उदरनिर्वाह करीत होता मात्र परीचीत असलेल्या दोघांनी रविवारी पहाटेच्या सुमारास त्याच्यावर चाकूसारख्ख्या धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या छातीसह हातावर खोलवर वार लागल्याने परीसरातील नागरीकांनी धाव घेऊन त्याला तत्काळ जळगाव येथे जिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृत घोषीत केले. दरम्यान, पूर्ववैमनस्य, उधारीचा वाद यासह अन्य कारणांमुळे खून झाल्याची चर्चा आहे.





पोलिस अधिकार्‍यांची धाव
पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे , बाजारपेठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खुनाचे ठोस कारण समोर आले नसलेतरी विविध कारणे समोर येत असून मूळ प्रकरण गुन्हा दाखल झाल्यानंतर समोर येणार आहे. दरम्यान, बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !