विवाहितेची सोशल मिडीयातून बदनामी : एकाविरोधात गुन्हा


Defamation of married woman through social media : Crime against one जळगाव : सोशल मिडीयातील बनावट फेसबुक खात्यावर प्रोफाईल व स्टेटसला विवाहितेचा फोटो ठेवून ऑनलाइन बदनामीकारक मजकूर प्रसिध्द करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 30 वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार सुनील खराटे नामक अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा सायबर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

संशयिताविरोधात गुन्हा दाखल
30 वर्षीय विवाहितेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. गुरुवार, 28 सप्टेंबर ते आजपावेतो संशयित सुनील खराटे नामक तरुणाने त्याच्या फेसबुक खात्याचे प्रोफाईल तसेच स्टेटसला विवाहितेचा फोटो ठेवला तसेच ऑनलाईन मजकूर प्रसिध्द करुन बदनामी केली. याप्रकरणी फेसबुक खाते धारकाविरुध्द तक्रारीवरुन सायबर पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे हे करत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !