सावदा येथे खाजगी ट्रॅव्हल्स व ट्रकची धडक : दोघे जखमी


Private travels and truck collide at Savada  : Two injured सावदा : सावदा शहरातून जाणार्‍या बर्‍हाणपूर-अंकलेश्वर शुक्रवार, 29 रोजी संध्याकाळी साडेसात वाजता साईबाबा मंदिराजवळ खाजगी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने दोघे जखमी झाले. खाजगी बसमध्ये 18 प्रवासी असल्याचे होते. त्यापैकी खाजगी बस चालक चौधरी नामक व्यक्ती जखमी झाला असून त्यास आशीर्वाद हॉस्पिटल, फैजपूर येथे दाखल करण्यात आले तसेच प्रवाशांपैकी अजंदा, ता.रावेर येथील तेरा वर्षीय बालक किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर सावदा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली.

खराब रस्त्यांमुळे अपघात वाढले.
सहा.पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, गुप्त वार्ता विभागाचे देवेंद्र पाटील, यशवंत टाकळे, पोलीस कॉन्स्टेबल कुरकुरे, पोलीस कॉन्स्टेबल संजय चौधरी, गृह रक्षक दलाच्या जवानांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. खाजगी जेसीबीच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली, दरम्यान या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काही दिवसांपूर्वी येथील पत्रकारांनी आंदोलन केले होते व यावेळी नहींच्या अधिकार्‍यांनी येथे येऊन तत्काळ या रस्त्याच्या दुरुतीचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप या कामास सुरवात झालेली नाही.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !