अट्रावलला अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त


Atraval seized tractor transporting illegal secondary minerals यावल : यावल तालुक्यातील अट्रावल येथे तहसीलदारांनी अवैधरीत्या गौणखनिजाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडल्याने खळबळ उडाली. या ट्रॅक्टरद्वारे खारवा वाहतूक केली जात होती व संबंधिताकडे परवाना नसल्याने ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात लावण्यात आले.

कारवाईने उडाली खळबळ
अट्रावल, ता.यावल येथील रहिवासी प्रशांत प्रकाश कुंभार हे ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 ए.पी. 8850) याव्दारे अवैधरीत्या गौण खनिज खारवाची वाहतूक करताना आढळल्यानंतर तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी ट्रॅक्टर मालक प्रशांत कुंभार यांना वाहतुकीचा परवाना विचारल्यानंतर त्यांच्याकडे परवाना नसल्याने ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावण्यात आले. ही कारवाई तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, मंडळाधिकारी मीना तडवी, तलाठी ईश्वर कोळी, एस.व्ही.सूर्यवंशी, विलास नागरे, वसीम तडवी, मिलिंद कुरकुरे, शरीफ तडवी आदींच्या पथकाने केली. ट्रॅक्टर मालकास दंड संदर्भात नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !