भुसावळातील पहिल्या महिला चालक माधुरी भालेराव यांचा सत्कार
Madhuri Bhalerao, the first woman driver in Bhusawal, was felicitated भुसावळ : भुसावळ एस.टी.आगारात नुकत्याच झालेल्या प्रथम बसवाहन चालक माधुरी भालेराव यांचा 2 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती व स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे निमित्त साधून पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे व हरीत शहर स्वच्छ शहर संकल्पना राबविणारे नाना पाटील यांनी बसस्थानकात जाऊन सत्कार केला.
यावेळी आगार व्यवस्थापक राहुल शिवदे व बसस्थानक प्रमुख भोई, तडवी आदी उपस्थित होते. भालेराव म्हणाल्या की, पहिली महिला वाहन चालक भुसावळ आगारात असल्याने अधिकार्यांसह प्रवाशांचे सहकार्य लाभत आहे. महिला वर्गाने या सेवेकडे वळल्यास पुरुषांची मक्तेदारी कमी होईल, असेही त्या म्हणाल्या.
