शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या नणंद-भावजयींचे मृतदेह आढळले


सिल्लोड : शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या नणंद-भावजयींचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. फरीदाबी शेख नसीर (35), यास्मिनबी शेख सगीर (28, रा.बोरगाव सारवाणी) अशी मृतांची नावे आहे. दोघ महिला नणंद भावजयी असून सोमवारी सकाळपासून बेपत्ता झाल्या होत्या. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

पीएम रीपोर्टनंतर मृत्यूचे कारण येणार समोर
सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सारवाणी येथील फरीदाबी आणि यास्मिनबी या दोघी सोमवारी सकाळी जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या. सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने उशिरा सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. मंगळवारी पहाटे दोघांचे मृतदेह पूर्णा नदीत तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली. सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येईल.





 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !