धुळ्यातील युवकाचा निर्घृण खून : कुविख्यात आरोपींना पुण्यासह राजस्थानातून गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या


Heinous murder of a youth in Dhule : The notorious accused have been shackled by the crime branch from Pune and Rajasthan. धुळे : शहरातील शुभम जगन साळुंखे (26 नवनाथ नगर, 50 खोलीजवळ, धुळे) या तरुणाची दगडफेक केल्याचा जाब विचारल्याच्या वादातून महेश पवार उर्फ लाल डोळा व त्याच्या साथीदाराने निर्घृण हत्या केली होती. ही घटना वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राऊंडवर रविवार, 8 रोजी रात्री पावणेअकरा वाजता घडली होती. याप्रकरणी पसार सहा संशयितांना धुळे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.

सहा आरोपींच्या विविध ठिकाणावरून आवळल्या मुसक्या
शुभम साळुंखे या तरुणाच्या खून प्रकरणी आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित गणेश अनिल पाटील हा पसार होण्याच्या तयारीत असतांनाच त्यास शिताफीने कॉटन मार्केट, पारोळा रोड, धुळे येथून अटक करण्यात आली.

अन्य तीन संशयित नाशिक येथून संगमनेरमार्गे पुण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने दिधी येथील मॅग्झीन चौकातून संशयित महेश उर्फ घनश्याम प्रकाश पवार (32, स्वामी नारायण कॉलनी, मार्केट यार्ड, धुळे), गणेश साहेबराव माळी (20, रा.50 खोली शांती नगर, कॉटन मार्केटच्या मागे, धुळे), जगदीश रघुनाथ चौधरी (18, रा.स्वामी नारायण कॉलनी, मार्केट याड, धुळे) यांना अटक करण्यात आली.

शिवाय अन्य संशयित अक्षय श्रावण साळवे, जयेश रवींद्र खरात उर्फ जब्या हे राजस्थानमध्ये पसार झाल्यानंतर अजमेरहून इंदौरकडे लक्झरी बसने येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रतलाम येथे आलेल्या एका खाजगी लक्झरी बसमधून त्यांना अटक करण्यात आली.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, अमरजित मोरे, संजय पाटील, संदीप सरग, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, संदीप जगन्नाथ पाटील, रवीकिरण राठोड, तुषार सुर्यवंशी, प्रल्हाद वाघ, सुशील शेंडे, शशीकांत देवरे, मुकेश वाघ, जितेंद्र वाघ, योगेश साळवे, अमोल जाधव आदींच्या पथकाने केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !