धुळ्यातील तरुणाच्या खिशातील 36 हजारांचे दागिने लांबवले ; चोपडा बसस्थानकातील घटना
Jewels worth 36,000 in the pocket of a young man in Dhula were stolen ; Incident at Chopra Bus Stand चोपडा : बसमधील गर्दीचा फायदा घेत भामट्याने धुळ्यातील तरुणाच्या खिशातील सोन्याचे दागिणे ठेवलेली डबी लंपास केली. ही चोपडा-जळगाव बसमध्ये चढताना 21 रोजी दुपारी एक ते दिड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गर्दीचा फायदा घेत लांबवले दागिने
रूपेश प्रकाश सूर्यवंशी (36, फॉरेस्ट कॉलनी, धुळे) हा तरुण कामानिमित्त शनिवार, 21 रोजी चोपडा शहरात आला होता. काम आटोपल्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास चोपडा-जळगाव बस (एम.एच.40 एन.9835) मध्ये चढत असताना 40 ते 45 वयोगटातील पांढरा शर्ट घातलेल्या अज्ञाताने खिशातील प्लॉस्टीक डबी लांबवली. या डबीत आठ ग्रॅम वजनाचे झुमके, चार ग्रॅम वजनाचे काप असे एकूण 12 ग्रॅम वजनाचे व 36 हजार रुपये किंमतीचे दागिने होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणाने चोपडा पोलिसात तक्रार दाखल केली. नाईक किरण गाडीलोहार करीत आहेत.




