नाल्यात फुलवली गांजा शेती ; धुळे गुन्हे शाखेच्या कारवाईत सव्वादोन लाखांचा गांजा जप्त


Ganja cultivation flourished in the canal ; In the action of the crime branch, cannabis worth two and a half lakhs was seized धुळे : धुळे तालुक्यातील वेल्हाणे (कुंडाणे) शिवारातील एका शेताच्या बाजूला असलेल्या नाल्यात गांजा फुलवण्यात आल्याची गोपनीय धुळे गुन्हे ाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर पथकाने रविवार, 22 रोजी छापा टाकत दोन लाख 20 हजार 100 रुपये किंमतीचा सुमारे 55 किलो ओल्या गांज्याची झाडे जप्त केली. याप्रकरणी वेल्हाणे-कुंडाणे येथील परशूराम पुना ठाकरे या संशयिताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांना गांज्या शेतीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. रविवारी दुपारी पोलिसांचे पथक वेल्हाणे-कुंडाणेतील परशुराम ठाकरे यांच्या शेतात धडकल्यानंतर शेतालगतच्या नाल्यात गांजाची बेकायदेशीरपणे लागवड करण्यात आल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी 55 किलो 55 ग्रॅम वजनाचे चार ते पाच फूट उंचीचे झाडे जप्त केली. संशयित ठाकरे याच्याविरोधात धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, हवालदार संदीप सरग, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, प्रकाश सोनार, संदीप पाटील, प्रल्हाद वाघ, तुषार सूर्यवंशी, प्रशांत चौधरी, चालक राजीव गीते आदींच्या पथकाने केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !