भुसावळ शहरात उद्या रावण दहन ; गेवराईतील फटाक्यांच्या आतषबाजीचे आकर्षण


Ravan Dahan tomorrow in Bhusawal  : The attraction of Fireworks display in Gevrai भुसावळ : शहरातील टीव्ही टॉवर मैदानावर सालाबादाप्रमाणे मातृभूमी मंडळातर्फे दसर्‍याला राहन दहनााचा कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. यंदाच्या उत्सवात गेवराई येथील कलाकारांकडून रंगबेरंगी फटाक्यांची आतषबाजी होईल.

आमदारांच्या हस्ते रावण दहन
आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते रावण, उद्योगपती मनोज बियाणी यांच्याहस्ते कुंभकर्ण तर किरण महाजन यांच्याहस्ते मेघनाथच्या प्रतिमेचे दहन होईल. खासदार रक्षा खडसे, प्रांत जितेंद्र पाटील, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे, तहसीलदार निता लबडे, शहर पोलिस निरीक्षक गजानन पडघन, बाजारपेठचे निरीक्षक बबन आव्हाड, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन जगताप आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

पुतळे तयारीला वेग
मंडळाने यंदा 35 फुट उंचीच्या रावण व 30 फुट उंचीच्या कुंभकर्ण व मेघनाथ यांची पुतळे तयार करण्याचे नियोजन केले आहे. कलाकार भगवान खरारे यांच्याकडून परंपरागत पध्दतीने हे पुतळे तयार करून घेतले जात आहे. यासोबत मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी टिव्ही टॉवर मैदानावर साफसफाई करुन रावण, कुंभकर्ण व मेघनाथ यांच्या पुतळ्याची निर्मिती साकारली जात आहे. गेवराई येथील प्रसिध्द आकर्षक आतषबाजी होणार आहे. रावण, मेघनाथ व कुंभकर्ण यांच्या प्रतिमेतील आतषबाजीसोबतच विविध प्रकारची आकर्षक रंगेबेरंगी आतीषबाजी यंदाच्या रावण दहन उत्सवातील आकर्षण राहिल. यासाठी मंडळाने तयारी सुरू केली आहे.

जय्यत तयारी सुरू
टीव्ही टॉवर मैदानावर रावण, मेघनाथ व कुंभकर्ण यांचे पुतळे उभे करण्यासाठी पोल लावण्यात येणार आहेत तर याच बाजूला व्यासपीठ तयार केले जाणार आहे. परिसरात वाहनांची पार्किंगची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती जय मातृभूमी मंडळाचे अध्यक्ष किरण कोलते यांनी दिली.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !