भालोद येथे 48 वर्षीय इसमाची राहत्या घरात आत्महत्या
48-year-old Isma committed suicide at her residence in Bhalod यावल : यावल तालुक्यातील भालोद येथील एका 48 वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार निर्दशनास आल्यावर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
भालोद येथील रहिवासी चंद्रकांत उर्फ गणेश पुरुषोत्तम भारंबे (48) हे आपल्या घरी असताना त्यांनी छताच्या लाकडी दांड्याला गळ्यातील लांब रुमाल बांधून गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली व त्यांना तेथून काढून रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश चौधरी करीत आहेत.


