भुसावळातील खून प्रकरण : संशयिताला 1 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी
Bhusawal murder case : Suspect remanded to police custody till November 1 भुसावळ : शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ता दिलीप रामलाल जोनवाल (53, रा.महात्मा फुले नगर) यांचा डोक्यात लोखंडी रॉड मारून खून करण्यात आला होता. ही घटना दुसर्या दिवशी गरूड प्लॉट भागातील क्रांती चौकात मंगळवारी रात्री 11.45 वाजेच्या सुमारास घडली होती. खून प्रकरणी आदिल दस्तगीर खाटीक (गवळीवाडा, भुसावळ) व साजीद सगीर खाटीक (गवळीवाडा, भुसावळ) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तर साजीद यास अटक करण्यात आली होती. संशयिताला गुरुवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता 1 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
24 वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला
शहरातील गवळीवाडा भागातील दस्तगीर गफूर खाटीक यांची 1999 मध्ये दिलीप जोनवालसह अन्य संशयीतांनी हत्या केली होती. वडिलांची हत्या केल्याचा राग संशयित आदिल दस्तगीर खाटीक (गवळीवाडा, भुसावळ) सह पुतण्या साजीद सगीर खाटीक (गवळीवाडा, भुसावळ) यांच्या डोक्यात असल्याने त्यांनी दसर्याच्या दिवशी मंगळवारी रात्री 11.45 वाजेच्या सुमारास दिलीप जोनवाल हे अकलूद येथून जेवण करून गरूड प्लॉट भागात येताच त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने जोनवाल यांचा मृत्यू ओढवला होता. यावेळी झालेल्या झटापटीत चाकू आदिल यास लागल्याने तो जखमी झाल्यानंतर पोलिसांनी त्यास निगराणीत खाजगी रुग्णालयात दाखल केले तर दुसरा संशयित साजीद सगीर खाटीक यास अटक केली. संशयिताला गुरुवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास 1 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे करीत आहेत.


