गावठी पिस्टलाच्या धाकावर दहशत : धुळ्यातील तरुण एलसीबीच्या जाळ्यात


Panic at gunpoint in village : Youth of Dhula in LCB’s net धुळे : गावठी पिस्टलाच्या धाकावर दहशत निर्माण करणार्‍या तरुणाला धुळे गुन्हे शाखेने अटक केली आहे. विशाल भरत पाटील (शांती नगर, सुरतवाला बिल्डींगमागे, धुळे) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. संशयिताकडून गावठी पिस्टलासह दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शांती नगर परीसरातील विशाल भरत पाटील हा पिस्टलाच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने 42 हजार रुपये किंमतीचे पिस्टल व दोन जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई मंगळवार, 31 ऑक्टोबर रोजी दुपारी करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदें, पोलिस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, बाळासाहेब सूर्यवंशी, कर्मचारी मच्छिंद्र पाटील, रवीकिरण राठोड, निलेश पोतदार, सुशील शेंडे, हर्षल चौधरी, गुणवंत पाटील, सागर शिर्के यांच्या पथकाने केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !