धुळे गुन्हे शाखेने रोखली गांजा तस्करी : अहमदनगरचा संशयित 51 हजारांच्या गांजासह जाळ्यात
Dhule Crime Branch intercepts ganja smuggling: Ahmednagar suspect nabbed with 51 thousand worth of ganja धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे धुळ्याहून मालेगावात होणारी गांजा तस्करी रोखत अहमदनगरच्या संशयिताला बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातील तीन लाखांची स्वीप्ट कार व 51 हजारांचा गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई धुळे-मालेगाव महामार्गावरील अवधान गावाजवळ बुधवार, 1 रोजी करण्यात आली. मेहबूब खान उस्मान खान (62, ईमाम कोटला, घास गल्ली, अहमदनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे गुन्हे शाखेचे स्थानिक निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गांजा तस्करीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धुळ्यातील अवधान गावाजवळ सापळा रचला. स्वीप्ट क्रमांक (एम.एच.14 डी.झेड.8055) आल्यानंतर तिची झडती घेतली असता त्यात 51 हजार 50 रुपये किंमतीचा दहा किलो गांजा जप्त करण्यात आला तसेच तीन लाख रुपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश राऊत, उपनिरीक्षक अमरजीत मोरे, शाम निकम, संदीप पाटील, प्रकाश सोनार, प्रशांत चौधरी, मायूस सोनवणे, चेतन बोरसे, कमलेश सूर्यवंशी, सागर शिर्के, योगेश साळवे, चालक गुलाब पाटील आदींच्या पथकाने केली.




