दोन हजारांचे लाच प्रकरण : जळगाव कारागृहातील लाचखोर सुभेदारासह तिघांची पोलिस कोठडीत रवानगी
2000 bribe case : Jalgaon Jail Bribery Subhedar along with three Sent to Police Custody जळगाव : जळगाव कारागृहातील कैद्याला भेटू देण्यासाठी जेलच्या सुभेदारासह अन्य दोन महिला कर्मचार्यांनी दोन हजारांची लाच मागून ती प्रत्यक्ष स्वीकारल्याने त्यांना धुळे एसीबीच्या पथकाने बुधवार, 8 नोव्हेंबर रोजी दुपारी दिड वाजता अटक केली होती. तिघा लाचखोरांना गुरुवारी जळगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची अर्थात 11 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
संशयित पोलिस कोठडीत
सुभेदार भीमा उखडू भील (53, महाबळ रोड, तापी पाटबंधारे, जाणता राजा व्यायाम शाळेजवळ, वर्षा बिल्डिंग, दुसरा मजला, रूम नं 8, जळगाव व मूळ रहिवासी दत्त मंदिराजवळ, मु.पो.जयनगर, ता. शहादा), हेमलता गयबू पाटील (29, प्लॉट नंबर 1/5/3, गट नं 180, गिरणा पंपिंग रोड, वाघ नगर, दत्त मंदिरसमोर, गिरणा पंपिंग रोड, वाघ नगर, दत्त मंदिरासमोर, जळगाव), महिला कॉन्स्टेबल पूजा सोपान सोनवणे (30, कारागृह क्वाटर्स क्रमांक दोन, जिल्हा अधिकारी कार्यालय आवार, जळगाव) यांना बुधवारी लाच प्रकरणात अटक करण्यात आल्याने आता त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.
असे आहे लाच प्रकरण
पहूरच्या अंगणवाडीत शिक्षिका असलेल्या तक्रारदार यांचा मुलगा 307 च्या गुन्ह्यात संशयित आरोपी असून त्याची जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आली. मुलाला भेटण्यासाठी तक्रारदार आईकडे लाचखोर ड्युटीवरील कर्मचारी दरवेळी दोन हजारांची लाच मागत होते. तक्रारदाराची लाच द्यावयाची परीस्थिती नसल्याने त्यांनी मंगळवार, 7 रोजी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर बुधवारी सापळा रचण्यात आला. तिघाही संशयितांनी दोन हजारांची लाच भेट घडवून आणण्यासाठी मागितल्याने त्यांना बुधवारी दुपारी दिड वाजता लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. महिला पोलिस हेमलता पाटील यांनी लाच स्वीकारली तर लाच स्वीकारण्यासह अन्य दोघांनी सहाय्य केल्याने त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, धुळे एसीबीकडे हा तपास जळगाव एसीबीकडे वर्ग करण्यात आला. तपास पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एन.एन. जाधव करीत आहेत.




