खान्देशातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा : धुळ्याहून मुंबईसाठी सोमवारपासून नियमित एक्स्प्रेस धावणार


Big relief for railway passengers in Khandesh : Regular express will run from Dhule to Mumbai from Monday भुसावळ  : रेल्वे प्रवाशांच्या उदंड प्रतिसादानंतर धुळे ते मुंबई एक्स्प्रेस नियमित चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. धुळ्याचे खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी ही गाडी नियमित चालवण्यासाठी पाठपुरावा केल्याने त्यास यश आले आहे.

खान्देशच्या प्रवाशांना मोठा दिलासा : दररोज मुंबईसाठी स्वतंत्र गाडी
गाडी क्रमांक 11011 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-धुळे एक्स्प्रेस सोमवार, 13 नोव्हेंबरपासून नियमित धावणार आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 12 वाजता सुटल्यानंतर त्याच दिवशी रात्री 8.55 वाजता धुळ्याला पोहोचणार आहे तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 11012 धुळे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस धुळे स्थानकावरील पहाटे साडेसहा वाजता सुटेल व त्याच दिवशी दुपारी 12.15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचणार आहे.

या स्थानकावर थांबे
या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड जंक्शन, नांदगाव, चाळीसगाव, जामदा, शिरूड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला 16 असतील. त्यात एक वातानुकूलित चेअर कार, 13 साधारण (नॉन एसी) चेअर कार (पाच आरक्षित आणि आठ जनरल, एक साधारण द्वितीय श्रेणीसह ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार असेल.

11025/11026 पुणे-अमरावती दैनिक एक्सप्रेस
गाडी क्रमांक 11025 पुणे-अमरावती एक्स्प्रेस सोमवार, 13 नोव्हेंबरपासून पुणे येथून दररोज 11.05 वाजता सुटेल आणि अमरावती येथे दुसर्‍या दिवशी 12.55 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 11026 अमरावती-पुणे एक्स्प्रेस सोमवार, 13 पासून अमरावती येथून 10.50 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्‍या दिवशी 11.25 वाजता पोहोचेल.

या स्थानकावर थांबे
या गाडीला उरळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, कजगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, बडनेरा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एकूण 17 डब्बे असतील. त्यात एक वातानुकूलित चेअर कार, एक शयनयान, 13 साधारण (नॉन एसी) चेअर कार ज्यापैकी सात आरक्षित आणि सहा अनारक्षित, दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार असेल.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !