रेल्वे प्रवाशांनो ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची : पाचोरा-गाळणदरम्यान उद्या विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
Important news for you railway passengers : Special traffic and power block tomorrow between Pachora-Galan भुसावळ : भुसावळ विभागातील पाचोरा-गाळण स्टेशन दरम्यान तिसर्या लाईनच्या जोडणीसाठी मंगळवार, 5 डिसेंबर रोजी अप आणि डाऊन मार्गावर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक चार तासांसाठी घेण्यात येणार आहे. चार रेल्वे गाड्या सुमारे तासभर उशिराने धावणार आहेत.
तासभर उशिराने धावणार या गाड्या
अप 12628 नवी दिल्ली-बंगलोर एक्सप्रेस माहेजी स्थानकावर दुपारी 2.10 ते 3.15 पर्यंत थांबवण्यात येणार आहे तर गाडी क्रमांक 22130 प्रयागराज-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस म्हसावद स्थानकावर दुपारी 2.20 ते 3.15 वाजेपर्यंत 55 मिनिटे तसेच गाडी क्रमांक 12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस शिरसोली स्थानकावर 2.35 ते 3.15 वाजेपर्यंत 40 मिनिटे तसेच गाडी क्रमांक 12108 लखनौ-मुंबई एक्सप्रेस जळगाव स्थानकावर 2.35 ते 3.15 वाजेपर्यंत 40 मिनिटे थांबवण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाशांनी गैरसोयीची दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.