15 हजारांची लाच भोवली : दोन पोलिस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
15 thousand bribe: Two policemen in ACB’s net नाशिक : विरुद्ध दिशेने ट्राला जावू देण्यासाठी तडजोडीअंती 15 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी घोटी महामार्गच्या दोन तत्कालीन कर्मचार्यांना नाशिक एसीबीने बुधवारी सायंकाळी अटक केली आहे. कारवाईने नाशिक ग्रामीण पोलिसांमध्ये खळबळ उडाली. पोलिस नाईक कैलास रामदास गोरे व संतोष उत्तम माळोदे अशी अटकेतील पोलिसांची नावे आहेत. दोघा पोलिसांची काही महिन्यांपूर्वी घोटी महामार्ग पोलिस केंद्रावर नियुक्ती होती.
असे आहे लाच प्रकरण
पुण्यातील 37 वर्षीय ट्रान्सपोर्ट व्यावसायीक या प्रकरणात तक्रारदार आहेत. 37 वर्षीय तक्रारदार यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांचा ट्रेलर हा मुंबई दिशेकडून इगतपुरी दिशेकडे राष्ट्रीय महार्गा क्रमांक तीनवरून जात असताना ट्रेलर यास कसारा येथील घाटातून ईगतपुरीकडे विरुध्द दिशेने जाण्याची मुभा देण्यासाठी तसेच घाट ओलांडून देण्याच्या मोबदल्यात गोरे यांनी 20 हजार रुपये मागितले तसेच माळोदे यांनी 15 हजारात 19 मे 2023 रोजी तडजोड केली होती. लाचेचा संशय आल्यानंतर संशयितांनी लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागणी अहवाल आल्यानंतर बुधवारी त्यांच्याविरोधात इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक गायत्री जाधव, पोलिस निरीक्षक संदीप घुगे, ज्योती शार्दुल, अनिल राठोड, नितीन नेटारे आदींच्या पथकाने केली.





