भुसावळातील अल्पवयीन तरुणीवर अत्याचार : फोटो, व्हिडिओ व्हायरलची धमकी
Abuse of a minor girl in Bhusawal: Photo, video threat of virality भुसावळ : भुसावळ शहरातील एका भागातील अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आला तसेच पुन्हा संबंध ठेवू देण्यास नकार देण्यात आल्याने ः फोटो, व्हिडिओ व्हायरलची धमकी देण्यात आली. याप्रकरणी 17 वर्षीय पीडीतेने शहर भुसावळ पोलिसात तक्रार दिल्यावरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
फोटो, व्हिडिओ व्हायरलची धमकी
शहरातील एका भागातील अल्पवयीन तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर सन 2017 ते नोव्हेंबर 2023 दरम्यान (फेबु्रवारी 2019, जून 2019, ऑगस्ट 2019, तारीख नक्की नाही) शहरातील एका भागात निर्जनस्थळी अत्याचार करण्यात आला व पुन्हा शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केल्यानंतर फिर्यादीने नकार दिल्यानंतर आरोपीने फोटो व व्हिडिओ व्हायरलची धमकी दिली. त्रास असह्य झाल्याने पीडीतेने शहर पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहेत.


