दीपनगर रेल्वे उड्डाणपुलावर दुचाकी अपघात ; खेरखेड्यातील तरुणाचा मृत्यू


भुसावळ  : भरधाव दुचाकी पोलवर धडकल्याने मध्यप्रदेशातील खेरखेड्यातील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात दीपनगर रेल्वे उड्डाणपुलावर 5 फेब्रुवारी 2023 रोजी घडला होत. अपघातात मृत्यू झाल्याप्रकरणी मयत दुचाकीस्वाराविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. उदयसिंग शंकर पवार (33, खेरखेडा, खकणार, मध्यप्रदेश) असे मयताचे नाव आहे.

हलगर्जीपणाने दुचाकी चालवल्याने अपघात
उदयसिंग पवार हा तरुण दुचाकी (एम.एच.19 एफ.9908) ने भुसावळकडे भरधाव वेगाने असताना दीपनगर उड्डाणपूलावरील सिमेंट पोलवर दुचाकी धडकल्याने पवार हा गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला उपचारार्थ हलवण्यात आले असता 20 मार्च रोजी त्याचा मृत्यू ओढवला. हलगर्जीपणाने दुचाकी चालवून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयत दुचाकीस्वाराविरोधात हवालदार प्रेमचंद सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार योगेश पालवे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !