जळगावातील रेल्वे उड्डाणपुल लोर्कापणानंतर अज्ञातांनी कोनशीला फोडली
मंत्री गिरीष महाजनांचे नाव वगळल्याने व्यक्त झाली होती नाराजी
The railway flyover in Jalgaon was broken into by unknown assailants जळगाव :शहरातील पिंप्राळा गेटवरील रेल्वे उड्डाणपुलाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले मात्र या सोहळ्यात कोनशिलेसह कार्यक्रम पत्रिकेवर मंत्री गिरीष महाजन यांचे नाव नसल्याने भाजपा कार्यकर्त्यांसह पदाधिकार्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असताना आता मंत्री महांजनाचे नाव नसलेली कोनशिला फोडण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
मंत्री महाजन समर्थकांमध्ये उमटल्या प्रतिक्रिया
पिंप्राळा गेटवरील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व कोनशिला अनावरणाचा कार्यक्रम नुकताच पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला. या कोनशिलेवर खडसेंचे नाव होते तर दोन्ही ठीकाणी मंत्री महाजनांचे नाव वगळण्यात आल्याने भाजपासह मंत्री गिरीष महाजन यांच्या समर्थकांमध्ये कार्यक्रमस्थळी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.


मंत्री महाजनांसह मंत्री अनिल पाटलांचे नाव खडसेंचे दोन्ही ठिकाणी नाव आल्याने कार्यकत्यांसह समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती तर प्रोटोकॉल पाळण्यात आला नसल्याने पालकमंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती.
17 रोजी उद्घाटन झाल्यानंतर दुसर्याच दिवशी सोमवार, 18 रोजी उड्डाणपुलाच्या लोकार्पणाची कोनशिला अज्ञाताने फोडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आमदार एकनाथराव खडसे यांचे नाव होते, तो संपूर्ण भाग तोडण्यात आल्याचे सांगण्यात आले.





