यावलला काँग्रेस व युवक काँग्रेसकडून खासदारांच्या निलंबनाचा निषेध
यावल : यावल शहरातील बुरूज चौकात काँग्रेस व युवक काँग्रेसडून खासदारांच्या निलंबनाचा निषेध करण्यात आला. केंद्रातील सत्ताधारी भाजपाकडून हुकूमशाही पध्दतीने कामकाज सुरू आहे व त्यांनी काँग्रेससह विरोधी गटातील खासदारांना हेतू पुरस्कर निलंबीत केले अशा शब्दात काँग्रेकडून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावल शहरातून मार्गस्त होणार्या अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावरील बुरूज चौकात गुरूवारी सायंकाळी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येत खासदारांच्या निलंबनाचा निषेध केला. सत्ताधारी भाजपा हे हुकूशाही पध्दतीने काम करीत असून लोकशाही तुडवत आहे. सत्ताधार्यांना आरसा दाखवण्याचे काम करणार्या विरोधकांना हेतू पुरस्कर त्यांनी निलंबित केले आहे, असे सांगत केंद्र सरकारचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परीषदेचे माजी गटनेता प्रभाकर सोनवणे, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख फैजान शाह, शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरूड, शहराध्यक्ष कदीर खान, सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप सोनवणे, माजी नगरसेवक शेख असलम, समीर मोमीन, मनोहर सोनवणे, समीर खान, अनिल जंजाळे, जलील पटेल, इमरान पहेलवान, विक्की गजरे, पुंडलिक बारी, गुलाम रसुल शेख, अमर कोळी, अनिल पाटील, युनूस पिंजारी, नईम शेख, शेेख सकलैन, अभय महाजन, शरद पाटील सह आदींची उपस्थिती होती.







