पाल अभयारण्यात बिबट्या झाला कॅमेर्‍यात कैद


Leopard caught on camera in Pal Sanctuary खिर्डी : जळगाव जिल्ह्यातील यावल वनपरिक्षेत्रात पाल अभयारण्यात बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे. वन विभागाचे कर्मचारी वन परिसरात गस्तीवर असताना, रस्त्याच्या बाजूला कठड्यावर बिबट्या वावरताना दिसला. हे दृश्य त्यांनी कॅमेरात टिपलेले.

जंगल सफारी सुरू होणार
दोन दिवसांपूर्वी रात्री टिपलेल्या या विलोभनीय क्षणाचा व्हिडिओ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, पर्यटक आणि वन्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी असून, यावल वनपरिक्षेत्रात आगामी काळात ‘जंगल सफारी’ सुरू होणार असल्याची माहितीही जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेसबुक पेजवर दिली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !