किनगावात धक्का लागल्याच्या कारणावरून दंगल : 18 जणांविरुध्द परस्रविरोधी तक्रारीवरून दंगलीचा गुन्हा
Riot due to shock in Kingaon: Riot case against 18 people on anti-community complaint यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत दोन जण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटाकडून यावल पोलिस ठाण्यात तब्बल 18 जणांविरुद्ध दंगली सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तुंबळ हाणामारीत दोघे जखमी
किनगाव, ता.यावल या गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर सार्वजनिक जागेवर धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि हाणामारी झाली. लोखंडी कडे, फायटर याचा वापर होत दंगल घडली. यामध्ये सागर सपकाळे (21) व उखा जाधव (50) हे दोघे जखमी झाले. यातील जखमी 21 वर्षीय सागर सपकाळे या तरुणाला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. याप्रकरणी जखमी सागर बापू सपकाळे याच्या फिर्यादीवरून तोताराम पाटील, ऋषिकेश कुंभार, किरण कंडारे, सागर जाधव, गजू जाधव, उखा कैकाडी, निलेश कंडारे या सात जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दुसर्या गटाचीही तक्रार
दुसर्या गटाकडून उखा रामलाल जाधव (50) यांच्या फिर्यादीवरून रोहित दिलीप वानखेडे, रोहन राजू निकम, सागर बापू सपकाळे, प्रशांत जीत सोनवणे, विशाल तायडे, गणेश दिलीप साळुंखे, राहुल बापू साळुंखे, नाना मधुकर साळुंखे, गोल्या विजु साळुंखे, बापू सपकाळे व सागर राजू निकम या 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही गटाकडून एकमेकाविरुद्ध फिर्यादी देण्यात आल्याने 18 जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहेत.
