भुसावळ रेल्वेचा खत प्रकल्प पूर्ववत होणार सुरू ; रेल्वे स्थानकाचाही पुर्नविकास

नूतन महाव्यवस्थापक आर.के.यादव यांची ग्वाही : बसस्थानकातील ‘ती’ भिंत न बांधण्याचे आदेश


Fertilizer project of Bhusawal Railway will be restored; Redevelopment of railway station also भुसावळ : मध्य रेल्वेचे जी.एम.आर.के.यादव यांनी शुक्रवारी भुसावळ ते खंडवा रेल्वे स्थानकादरम्यान निरीक्षण केले. यावेळी त्यांनी भुसावळ रेल्वे स्थानकाची तसेच विविध विभागांची पाहणी केली. सायंकाळी त्यांनी डीआरएम कार्यालयातील सभागृहात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रेल्वेचा बंद पडलेला खत कारखाना पूर्ववत सुरू करण्यासह रेल्वे स्थानकाचा पुर्नविकास होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. भुसावळातून जाणार्‍या सात रेल्वे गाड्या कॉर्ड लाईनवरून धावत असल्याने त्यांना थांब्याबाबत विचारले असता जीएम यांनी त्या संदर्भात विचार करणार असल्याचे सांगितले तसेच राजधानी एक्स्प्रेसला भुसावळातील थांब्याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

बसस्थानकात भिंत न बांधण्याचे निर्देश
बसस्थानक आणि रेल्वे स्थानकाच्या मध्ये रेल्वे प्रशासनाकडून भिंत बांधण्याचा घाट सुरू असताना जी.एम.आर.के.यादव यांनी पाहणीदरम्यान भिंत न बांधण्याच्या सूचना केल्या. बसस्थानकासमोरील जागा रेल्वेची असल्याने येथे अतिक्रमण करू देऊ नका, अशा सूचना महाव्यवस्थापक आर.के.यादव यांनी केल्या. शुक्रवारी त्यांनी भुसावळ विभागातील भुसावळ खंडवा रेल्वे मार्गांचे, पूलांचे निरीक्षण केले. रेल्वे स्थानकांवरील सफाईची पहाणी केली. शुक्रवारी सकाळी आठ वाजता जीएम यादव यांनी पाहणीला सुरूवात केली. डीआरएम ईती पांडे व अन्य वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी रेल्वे स्थानक, प्लॅटफॉर्म, सरकते जिने, लिफ्टची पाहणी करण्यात आली.



बसस्थानकाबाहेरील भिंतीला ‘ब्रेक’
भुसावळ बसस्थानकातून रेल्वे स्थानकात जाण्याच्या मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून भिंत बांधण्याचा घाट होता मात्र जी.एम. यांनी स्पष्ट शब्दात भिंत न बांधण्याच्या सूचना केल्या. प्रवाशांच्या येण्या-जाण्यासाठी हा मार्ग मोकळा ठेवावा, अश्या सूचना यादव त्यांनी केल्या. बसस्थानकासमोरील रेल्वेच्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता झाल्याने तातडीने स्वच्छतेच्या सूचना त्यांनी केल्या. अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !