राज्य कर्मचार्यांचा दिलासा : आता पाच दिवसांचा आठवडा
मुंबई : राज्यातील सरकारी कर्मचार्यांनी पाच दिवसांचा आठवडा करण्याची केलली मागणी महाविकास आघाडी सरकारने मान्य केली असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णयाला मंजुरी देण्यात आली. राज्य सरकारन ेसरकारी कर्मचार्यांना हे दिलेले मोठे गिफ्ट मानले जात असून सरकारी कर्मचार्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. दरम्यान, सध्या केंद्रीय कर्मचार्यांसाठी 5 दिवसांचाच आठवडा आहे. तर, देशातील 7 राज्यांमधील कर्मचार्यांनाही 5 दिवसांचा आठवडा असून 2 दिवस सुट्टीचा लाभ मिळत आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही हा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारी कर्मचार्यांचा विकेंड कुटुंबासमवेत आनंदी जाणार आहे.