मोजमाप चुकल्याने वाढीव कराचा भूर्दंड : भुसावळकरांची भावना

दुसर्‍या दिवशी 1800 हरकतींवर प्रभाकर हॉलमध्ये सुनावणी


Bhusavlakar’s feeling of increased tax due to measurement error भुसावळ : भुसावळ पालिकेतर्फे शहरातील प्रभाकर हॉलमध्ये मालमत्ता पुनर्मूल्यांकनाबाबत सुनावणी सुरू असून दुसर्‍या दिवशी एक हजार 800 मालमत्ता धारकांनी उपस्थिती देत मोजमाप चुकल्याने वाढीव कराचा भूर्दंड बसल्याची तक्रार केली. तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेत याबाबत आता पंधरा दिवसांनी निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. शहरातील प्रभाकर हॉलमध्ये मालमत्ता पुनर्मूल्यांकनावर नागरीकांनी हरकती घेतल्याने सुनावणी सुरू असून गुरुवारी सुनावणीचा दुसरा दिवस होता तर आज शुक्रवारी सुनावणीचा अखेरचा दिवस आहे.

नियोजनपूर्वक हाताळणी
करदात्यांकडून प्राप्त झालेले अर्ज अनुक्रमांकानुसार लावले न गेल्याने बुधवारी गोंधळ उडाला होता मात्र गुरुवारी ही प्रक्रिया अत्यंत नियोजनपूर्ण पद्धतीने हाताळण्यात आली. नागरीकांनी गोंधळ न करता प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन मुख्याधिकारी महेश वाघमोडे, उपमुख्याधिकारी लोकेश ढाके यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !