भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयाच्या बॉक्सिंग खेळाडूची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड


भुसावळ  :शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील खेळाडू पवन संजय सावळे, गुलाम खान, प्रतीक दिनेश सुरवाडे व साक्षी जैस्वाल यानी आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा जळगाव व जळगाव विभाग संघाकडून खेळत आंतर विभागीय बॉक्सिंग स्पर्धा शिरपूर येथे उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ बॉक्सिंग संघात निवड झाली.

यांची होती उपस्थिती
आंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धा चंदीगड विद्यापीठ अंतर्गत् मोहाली पंजाब 27 ते 31 दम्यान होत आहेत. या खेळाडू यांची निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी सत्कार व अभिनंदन केले. यावेळी प्रा.डॉ.संजय चौधरी, महाविद्यालयातील क्रीडा समिती सदस्य प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.ए.आर.सावळे, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !