मुलींना शालेय दप्तर वाटपाचा उपक्रम आदर्शवत : आमदार \संजय सावकारे


भुसावळ : जिल्हा परीषद शाळांतील पटसंख्या टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर देणे आणि त्यादृष्टीने पूरक शैक्षणिक उपक्रम राबविणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने उपशिक्षिका ज्योती जैन यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कुर्‍हेपानाचे जिल्हा परीषद कन्या शाळेतील मुलींना दर्जेदार शालेय दप्तर वाटप हा राबवलेला उपक्रम समाजापुढे आदर्शवत आहे. विद्यार्थ्यांसाठी व्यायामाचे महत्व लक्षात घेऊन कुर्‍हे बॉईज शाळा, कन्या व उर्दू शाळेसाठी प्रत्येकी एक लक्ष या प्रमाणे तीन लक्ष निधीतून क्रीडा साहित्य फेब्रुवारीपर्यंत देणार असल्याची ग्वाही आमदार संजय सावकारे यांनी दिली. कुर्‍हेपानाचे शाळेत आयोजित दप्तर वाटपप्रसंगी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमप्रसंगी जिल्हा परीषदेचे माजी सदस्य विश्वनाथ पाटील, समाधान पवार, सरपंच कविता उंबरकर, उपसरपंच हरिचंद्र बरकले, माजी सरपंच रामलाल बडगुजर, सुरेश शिंदे, मार्केटचे उपसभापती, शिवाजी पाटील, भालचंद्र पाटील, सोपान भारंबे, कुर्‍हे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद उंबरकर, किशोर कोळी, दत्तू बावस्कर, विलास रंदाळे, शारदाबाई महाजन, दुर्गाबाई शिंदे, निर्मलाबाई पाटील, चंद्रकला पाटील, सावकार पारधी, गौतम मेघे, ग्रामविकास अधिकारी संतोष मोरे, माजी मुख्याध्यापक कालिदास कळसकर, भगवान गांधेले, किरण कळसकर, होमा पाचपांडे, कैलास पाटील, सखाराम बारी, नगरसेवक पिंटू ठाकूर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जिल्हा परीषदेचे माजी सदस्य विश्वनाथ पाटील यांनी केले तर आभार शाळेच्या उपशिक्षिका ज्योती जैन यांनी मानले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !