वरणगावात रेल्वे गाड्यांना थांब्यांचे आश्वासन : रेल्वे रोको स्थगित

महाव्यवस्थापक आर.के.यादव यांच्याकडे रेल्वे थांब्यासाठी प्रस्ताव रवाना


Assurance of stops for railway trains in Varanagaon: Rail stop suspended भुसावळ : वरणगाव रेल्वे स्थानकावर अप-डाऊन सेवाग्राम, सुरत-अमरावती सुपरफास्ट, सकाळी डाऊन महाराष्ट्र एक्सप्रेस आदी गाड्यांना तातडीने थांबा साठी रेल्वे प्रशासनाने महाव्यवस्थापक आर.के.यादव यांच्याकडे प्रस्ताव पाठवला असून लवकरच थांब्यांबाबत दखल घेण्यात येईल, अशी ग्वाही भुसावळ डीआरएम प्रशासनाने दिल्यानंतर वरणगावातील रेल्वे रोको स्थगित करण्यात आली.

आश्वासनानंतर तूर्त आंदोलन स्थगित
गुरुवारी संध्याकाळी सात वाजता रेल्वे रोकोच्या इशार्‍यानंतर डीआरएम कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीत डीआरएम ईती पांडे, एडीआर1एम शिवेंद्र कुमार यादव, अनिल कुमार पाठक, आर पी एफ चे वरिष्ठ अधिकारी व आर.डी.गुजर,यादव यांच्यासह पूर्ण स्टाफ उपस्थित होता. बैठकीत माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी बैठकीत खालील मागण्या प्रभावी मांडल्या.बैठकीत माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, प्रवासी संघटना अध्यक्ष नाना डेपो चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, योगेश माळी, सरचिटणीस भाजपा मुस्लिम अन्सारी आकाश निमकर, रमेश पालवे, डॉ.नाना चांदणे, साबीर कुरेशी उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !