भुसावळातील नाहाटा चौफुलीवर लिकेज पाईप लाईनची दुरुस्ती : पाच दिवस पाणीपुरवठा ठप्प

पाच दिवस पाणीपुरवठा राहणार प्रभावीत : नागरीकांची आता टँकरवर मदार


Repair of leakage pipe line at Nahata Chauphuli in Bhusawal : Water supply stopped for five days Repair of leakage pipe line at Nahata Chauphuli in Bhusawal : Water supply stopped for five days भुसावळ : भुसावळातील पु.ओं.नाहाटा चौफुलीनजीक जीर्ण पाईप लाईन लिकेज झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत असल्याने पालिकेने शुक्रवारपासून दुरुस्तीच्या कामाला वेग दिला आहे. सर्व्हिस रोडवर खोदकाम सुरू करण्यात आले असून दक्षिण भागात आता किमान पाच दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जीर्ण पाईप लाईनला गळती नेमकी कुठे आहे याबाबत अंदाज येत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. महामार्ग खोदकामाला परवानगी नाकारण्यात आल्याने दुरुस्तीला विलंब झाल्यानंतर आता खोदकाम सुरू करण्यात आले असून गळती आतमध्ये असल्यास क्रेनद्वारे डक्टमधून पाईप लाईन बाहेर काढावी लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

नागरीकांची आता टँकरवर मदार
नाहाटा अंडरपासजवळ पालिकेच्या पाईप लाईन फुटल्यानंतर तीन आठवड्यांपासून पाण्याचा अपव्यय होत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खोदकाम करू देण्यास परवानगी नाकारल्यानंतर दुरुस्ती लांबल्याने आता नियोजित बसस्थानकाजवळील सर्व्हिस रोड खोदण्यात येत आहे. किमान पाच दिवस हे काम चालणार असल्याने तो पर्यंत दक्षिण भागात पाणीपुरवठा ठप्प असेल तर तोपर्यंत मात्र नागरीकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. पालिकेने या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केेले आहे. गळती महामार्गाच्या आतील बाजूस असेल तर संपूर्ण पाईप लाइन क्रेनचा वापर करुन निघेल, असेही सूत्रांनी सांगितले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !