सात तासात 130 किलोमीटर सायकल चालवून त्यांनी साजरा केला थर्टीफस्ट !
चाळीसगावचे हौशी सायकलपटू : धुळे येथील स्वामीनारायण मंदिराला दिली भेट
He celebrated thirty-first by cycling 130 kilometers in seven hours ! चाळीसगाव : थर्टीफस्ट किंवा न्यू ईअर कसे साजरे करायचे कसे ? म्हणजे कुछ हटके असे बेत आखले जातात. चाळीसगाव येथील हौशी सायकलवीर रवींद्र पाटील, जिजाबराव वाघ, टोनी पंजाबी या तिघांनी चाळीसगाव ते धुळे असा 130 किमीची सायकलवारी करीत देवपूरस्थित स्वामीनारायण मंदिराला रविवारी भेट दिली. तिघा सायकलवीरांचा हा अनोखा संकल्प पाहून मंदिराचे प्रमुख आनंदजीवन यांनी विशेष कौतुक करीत आशिर्वाद दिला आणि आदरातिथ्थही केले.
कोरोना काळातही केली होती वारी
चाळीसगाव परिसरात पर्यावरण संरक्षणासोबतच प्रदूषण समस्येवर प्रबोधन करण्यासाठी गत चार वर्षात हौशी सायकलवीरांची मोठी फळी तयार केली झाली. दरदिवशी पहाटे 15 ते 20 सायकलावीर प्रभात सायकलवारी करीत आरोग्याचा मंत्र जागर करतात. रवींद्र पाटील, टोनी पंजाबी, जिजाबराव वाघ, दिपक देशमुख, हर्षल पाटील, हेमंत कुलकर्णी आदिंनी मे महिन्यात सायकरलने पंढपुरवारी केली. यावारीत त्यांनी अध्यात्मासोबचं वृक्ष लागवड, पर्यावरण समतोल असा संदेश दिला. कोरोना काळातही अशी पंढरपुर वारी त्यांनी केली आहे.


आगळा-वेगळा थर्टीफस्ट
वर्षाचा शेवट यादगार ठरावा. यासाठी रविवारी पहाटे 4 वाजता जिजाबराव वाघ, टोनी पंजाबी, रवींद्र पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून धुळ्याच्या दिशेने सायकलला पायडल मारले. पहाटेचे थंडगार वातावरण, धुके असा सामना करीत 65 किमीचे अंतर त्यांनी साडेतीनतासात पूर्ण केले.स्वामीनारायण मंदिरात सकाळची शृंगार आरती सुरू असतांना आनंदजीवन स्वामींनी कुठून व कसे आलात ? अशी चौकशी केली. स्वामीनारायण मंदिराच्या ओढीने थर्टीफस्टचा चांगला संदेश देण्यासाठी आलेल्या सायकलवीरांचे कौतुक वाटले. स्वामींनी मूर्तीवर अभिषेक करण्याची संधी दिली. चहा व नाश्ता अगत्याने देत असेच प्रभू समर्पित आणि तंदुरुस्त रहा… असा शुभाशिर्वादपर संदेशही दिला. यावेळी स्वामींनी आमदार मंगेश चव्हाण व चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाचे उपाध्यक्ष योगेश अग्रवाल यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क करीत चाळीसगावच्या तिघा सायकलवीरांचे कौतुकही त्यांना ऐकवले.
आरोग्याचा केला जागर : रवींद्र पाटील
आम्ही दरवर्षी थर्टीफस्ट व नूतन वर्षाचे स्वागत आरोग्याचा जागर करीतच साजरे करतो. यावर्षी आम्ही 31 रोजी रविवारी धुळे येथील स्वामी नारायण मंदिराला भेट दिली. आनंदजीवन स्वामींनी आमच्याशी आपुलकीने संवाद साधला, असे चाळीसगावातील हौशी सायकलवीर रवींद्र पाटील म्हणाले.





