भुसावळात मनसेत अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश
भुसावळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी नुकताच मनसेत प्रवेश केला. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा झाला. राज ठाकरे यांचे विचार आणि मनसे पक्षाचे ध्येय आणि धोरणे घरा घरापर्यंत पोहोचवू, असा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी तालुकाध्यक्ष दीपक सोनवणे, तालुका उपाध्यक्ष शिवा वाडे, सचिव विलास कोळी, दशरथ सपकाळे, महेंद्र तायडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.







