रनिंग, सायकलिंग, स्विमिंग व योगाभ्यासाद्वारे नवीन वर्षाची सुरुवात

भुसावळातील स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम


भुसावळ : नवीन वर्षाच्या सुरूवातीला प्रत्येक व्यक्ती संपूर्ण वर्षासाठी काहीतरी नियोजन अथवा संकल्प करतो. भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशन संपूर्ण वर्षभर भुसावळ शहरातील नागरीकांसोबत रनिंग, सायकलिंग, योगाभ्यास करीत असते. नवीन वर्षाची सुरुवात म्हणून सोमवार, 1 जानेवारी रोजी भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या सदस्यांनी एकत्र येत रनिंग, स्विमिंग, सायकलिंग व योगाभ्यास करून नवीन वर्षाची सुरुवात आदर्शवत केली. संपूर्ण भुसावळ शहरवासीयांना आरोग्याचा मूलमंत्र दिला.

पहाटेच्या थंडीत धावले सदस्य
डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर पहाटे 5.45 वाजता सर्वप्रथम सर्व धावपटूंनी एकत्र येऊन वॉर्म अप केल्यानंतर शहरातील आरपीडी रोडवर चारुलता अजय पाटील, ममता ठाकूर, सुनीता सोमदत्त सिंग, सुनीता रंजन सिंग, मनीषा सिंग, पिंकी सिंग, पुष्पलता चौधरी, प्रीती पांडा, अर्चना दत्तात्रय चौधरी, मुकेश चौधरी, संजय भदाणे, संजीव पाटील, अजय आंबेकर, तरुण बिरीया, सुरेश सहानी, अजय पाटील, राजेंद्र ठाकूर, प्रदीप माळी, राजेंद्र घाटे, संतोष घाडगे, रणजीत खरारे, प्रवीण वारके, प्रवीण पाटील या धावपटूंनी 5 किमी ते 10 किमी अंतर धावल्यानंतर सर्व धावपटू पुन्हा क्रीडांगणावर परतले. त्यानंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज घेण्यात आली.



त्याशिवाय 2024 या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ताराचंद खरारे,मंगेश चंदन, गणसिंग पाटील या तीन धावपटूंनी एकत्रीतरीत्या चक्क 24 किमी धावून नववर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने केले. त्याचबरोबर विजय फिरके यांनी अतिशय थंड वातावरण असून देखील तापी नदीच्या पात्रात 700 मीटर स्विमिंग करून संपूर्ण भुसावळ शहरवासीयांसाठी आरोग्याचा मूलमंत्र दिला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !