भाजपा व्यापारी आघाडीच्या भुसावळ शहराध्यक्षपदी जितेश माखिजा
Jitesh Makhija as Bhusawal City President of BJP Traders Aghadi भुसावळ : भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या भुसावळ शहराध्यक्षपदी भुसावळातील जितेश प्रकाशलाल माखिजा यांची नुकतीच भुसावळ शहराध्यक्ष युवराज लोणारी यांनी निवड करण्यात आली. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, अजय नागराणी, निकी बत्रा, संदीप सुरवाडे, केशव गेलाणी, रिंकू चेलाणी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







